• Sat. Mar 7th, 2026
    Thane Crime: बायकोसोबत बाईकवर जाताना शस्त्रांनी हल्ला, वाचवायला आलेल्यांनाही बेदम मारहाण

    ठाणे : कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरात १५ जणांच्या टोळीने तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीक्ष्ण हत्याराने हा हल्ला केल्याने या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत.

    नेमकी काय घडली घटना?

    चक्कीनाका भागात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन आपल्या पतीसोबत चाललेल्या एका महिलेवर १५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले तीन पादचारी टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झाले. जखमींवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    भारतातील टोमॅटोचे दर आवाक्यात येणार? पुरवठ्यासाठी नेपाळची तयारी, फक्त घातली एक अट
    कल्याण पूर्व भागात राहणारा तौशिब सय्यद आपल्या दुचाकीवरुन पत्नीसह चक्की नाका भागातून चालला होता. यावेळी १५ जणांच्या टोळक्याने तौशिबची दुचाकी अडवून त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन तिला मारहाण सुरू केली. याचवेळी टोळक्यातील काही जणांनी धारदार शस्त्रांनी महिलेवर हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. पती तौशिबला टोळक्याने मारहाण केली.

    महिलेवर हल्ला होत आहे पाहून काही पादचारी तिच्या बचावासाठी पुढे आले तर टोळक्याने त्यांनाही गंभीर जखमी केले. जखमींच्या डोक्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले होते. महिलेला जखमी केल्यानंतर टोळके घटनास्थळावरुन पसार झाले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तौशिब सय्यद याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १५ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

    दरम्यान, कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे घडत आहेत. तरीही पोलिसांचा वचक आणि भीती गुन्हेगारांना नसल्याचे दिसून येते. दिवसाढवळ्या नागरिकांसमोर धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

    Pune News : फक्त पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खास प्लॅन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed