भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा यांनी ही माहिती दिली. या वेळी महाव्यवस्थापक संजय कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा यांनी देशात २४ हजार गावांमध्ये मोबइल नेटवर्क उपलब्ध नाही. अशा गावांमध्ये दहा हजार कोटी रुपये खर्च करून नेटवर्क तयार करण्याचे काम बीएसएनएलला देण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्रात २२५ गाव आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात १५ गावांचा समावेश आहे. यात जालना येथील १९, बुलढाणा ४४ अशी संख्या आहेत. या गावांमध्ये मोबइल सुविधांसाठी राज्य शासनाने टॉवर उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत या गावांमध्ये मोबइल फोन रिचेबल करण्याचा मानस असल्याची माहिती रोहित शर्मा यांनी दिली.
या गावांमध्ये मोबइल टॉवरची सुविधा उपलब्ध करून देत असताना, या गावांमधील मोबइल सेवेला अडचण होऊ नये. यासाठी सोलार पॅनलद्वारे वीज सेवा देण्याचे नियोजीत आहे. तसेच ज्या गावांमध्ये वीजेची सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी पारंपारिक उर्जा स्रोताद्वारे मोबइल टॉवरची सेवा चालविण्यात येणार असल्याचे संकेत रोहित शर्मा यांनी दिले.
४ जी तंत्रज्ञान विकसित करणारी चौथी कंपनी
फोरजी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बीएसएनएल कंपनीकडून बीटीएस (बेस ट्रान्सरिसीव्हर स्टेशन) तयार करण्यात यश मिळविले आहे. जगात हे तंत्रज्ञान तीन कंपन्यांकडे होते. यात नोकीया, ब्रीक्सन यासह अन्य एक विदेशी कंपनीकडे होते. बीएसएनएल सह अन्य सहयोगी कंपन्यांच्या मदतीने बीटीएस तंत्रज्ञान विकसित करणारी जगात चौथी कंपनी झाली आहे. या कंपनीला २०० बीटीएस तयार करण्याचे ऑर्डर मिळाले आहे. अशीही माहिती रोहित शर्मा यांनी दिली.
डिसेंबरपासून फाइव्ह जी देण्याचा प्रयत्न
सध्या बीएसएनएल थ्रीजी सेवा देत आहे. सध्या मोबइलचा वाढता वापर आणि डाटाची गरज यामुळे फाईव्ह जीची मागणी केली जात आहे. या वर्षी डिसेंबरपासून बीएसएनएल कंपनी फाईव्ह जी सर्व्हिस देण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती रोहित शर्मा यांनी दिली.
नेटवर्कमध्ये येणारी दावे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोबइल टॉवर उभारून १५ गावांमध्ये मोबइल रेंज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात बेलखाडा तांडा, लिंगदरी, दस्तापूर, दुधमळ, पीरवाडी, कोफला, जळगाव, बोडखा, कानकुरण, गोकुळवाडी, आडगाव माहुलीसह अन्य गावांचा समावेश आहे.