मुंबई : विधानपरिषदेच्या सभागृहात आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी प्रथम काँग्रेसचे भाई जगताप आणि नंतर भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. पुरवणी मागण्यांवर चर्चेत बोलत असताना भाजपचे पडळकर यांना वेळेचे बंधन पाळण्याची सूचना उपसभापतींनी केली. तुम्ही मला बोलू देत नाही असे सांगत पडळकर यांनी हातातील कागद सभागृहात फाडून उपसभापतींचा निषेध केला. परिणामी आज दिवसभर पडळकर यांना सभागृहात बोलण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला.
सभागृहातील वर्तनाबाबत गोपीचंद पडळकर यांच्या कृतीवर संतप्त होऊन, सभागृहातील हे वर्तन संसदीय कामकाजाच्या परंपरेला शोधा देणारे नाही अशा शब्दात उपसभापतींनी नाराजी व्यक्त केली. अखेर मार्शलला पाचारण करुन पडळकर यांना सभागृहाबाहेर काढण्याचा उपसभापतींनी इशारा देऊनही पडळकर शांत होत नव्हते.

या वादात शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर, नरेंद्र दराडे यांनी मध्यस्थीचा करुन पडळकर यांना झाल्या प्रकाराबाबत समज देण्याचा प्रयत्न केला.
माझी चूक नसतानाही माझे शब्द माघारी घेतो. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, अशी दिलगिरी पडळकर यांनी केली. गोपीचंद पडळकर यांच्याकडून गोऱ्हे यांच्याशी वाद घालण्याची जी कृती घडली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पडळकर यांना आवश्यक त्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात येतील असे सभागृहाला आश्वासित करतो असे सांगून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.