• Mon. Nov 25th, 2024
    विधानसभा लक्षवेधी

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अपघात कमी

    करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – मंत्री दादाजी भुसे

    मुंबईदि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

    सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.

    ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे आता कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोज किमान १७-१८ हजार वाहने प्रवास करतात. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. अजून दोन टप्पे बाकी असून त्यातील एक टप्पा सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि शेवटचा टप्पा मे -२०२४ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे तसेच ड्रायव्हिंग करताना चालक सतर्क नसणे, वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे, वाहन चालकाचा डोळा लागणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे, व्यसन करून वाहन चालविणे, आग लागणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहनाचा तोल जाऊन उलटणे ही  अपघात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.

    मंत्री श्री. भुसे म्हणाले की, हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसारच संकल्पित केला असून वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, महामार्ग पोलिसांमार्फत व आर.टी.ओ. मार्फत अपघात होऊ नये यादृष्टीने वाहन चालकांना वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारणी करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, क्रॅटआईज व डेलिनेटर्स लावण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

    समृध्दी महामार्गावर वाहनांचे टायर तपासणी करिता पथकर नाक्यांवर आर.टी.ओ विभागास जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महामार्गावर रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्ट‍िम (ITS) स्थापित केली जाणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

    सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि अपघातग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्यासाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, रुग्णवाहिका, गस्त वाहने, क्रेन, उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

    सदस्य संजय गायकवाड, ज्ञानराज चौगुले आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

    दीपक चव्हाण/विसंअ/

    ०००

    पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील मलवाहिन्या

    कामांच्या निविदांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत

     पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या निविदांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( सीओईपी) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ पद्धतीने लेखापरीक्षण केले जाईलअशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी दिली.

    सदस्य भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सामंत यांनी उत्तर दिले.

    ते म्हणाले कीपुणे मनपाच्या ११ समाविष्ट गावांमधील विविध कामांच्या संदर्भात तज्ञ सल्लागार यांची नियुक्ती करून जागेवरील सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. जागेवरील भौगोलिक परिस्थिती व सन २०४७ पर्यंतची भविष्यात होणारी लोकसंख्येतील वाढ गृहीत धरून हायड्रोलिक डिझाईन करून मुख्य मलवाहिन्या व मैलापाणी गोळा करावयाच्या वाहिन्यांचा व्यास ठरविण्यात आलेला आहे. या ११ गावांमध्ये प्रत्यक्ष मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु असून ते प्रगतीपथावर आहे.सन २०४७ पर्यंतच्या लोकसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आलेले आहे. हे काम निविदेमध्ये दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन  असल्याची माहिती त्यांनी दिली.

    यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी यांच्या काही तक्रारी असतील तर त्या अनुषंगाने नगरविकास सचिवांना पुण्यात बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतीलअसे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

    सदस्य ॲड. राहुल कुलदिलीप लांडे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

    000

    दीपक चव्हाण/विसंअ/

     

     

    वसंतराव नाईक तांडा – वस्ती सुधार योजनेतील

    लोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक – मंत्री अतुल सावे

    मुंबईदि. 25 : वसंतराव नाईक तांडा – वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्येचा निकष बदलण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने या अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेण्यात येईलअशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

    सदस्य योगेश कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.

    ते म्हणाले कीराज्यातील ग्रामीण भागातील विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या तांडे/ वाडी/ वस्त्यांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर सन २००३-०४ या वित्तीय वर्षांपासून “वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे.

    या योजनेंतर्गत पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम व निकड विचारात घेऊन विकास कामांची निवड केली जाते. तांडा/ वस्त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत तांडा / वस्तीमध्ये  विद्युतीकरण (हायमेक्सपथदिवेएलईडी बसविणे)पिण्याचे पाणीअंतर्गत रस्तेगटारेशौचालये तसेच समाज मंदिर/वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे,  सभागृह / समाजमंदिर या पायाभूत सुविधांची कामे करण्यात येतात. मात्रया कामामध्ये लोकसंख्येचा निकष ही अडचण असेल, तर ती बदलण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येईलअशी माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.

    सदस्य नितेश राणेरोहित पवार यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

    000

    दीपक चव्हाण/विसंअ/

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *