मयुरी हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण राहाता येथे झाले तर शिर्डी येथील मनोज जयस्वाल यांचंही शिक्षण बारावीपर्यंत झालेले असून दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामास असल्याने त्यांची मैत्री झाली व पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांच्या घरच्यांनीही लग्नास परवानगी दिली व विवाह सोहळा राहाता शहरात स्मशान भूमीच्या प्रांगणामध्ये थाटामाटामध्ये संपन्न झाला.
आज कालच्या अत्याधुनिक काळात आपल्या प्रिय मुला-मुलींचे लग्न मोठ्या अवाजवी पद्धतीने खर्च करून विवाह सोहळा साजरा केला जातो. परंतु राहाता शहरातील स्मशान जोगी याला अपवाद ठरले आहे. आपल्या पारंपारिक पद्धतीने विधीपूर्वक विवाह सोहळा यावेळी संपन्न झाला. सन २००३ मध्ये राहाता येथे स्मशान भूमीमध्ये वास्तव्यात आलेले गायकवाड कुटुंब हे शहरांमध्ये स्थायिक झाले.
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची तालुक्यात चर्चा होत होती. या विवाह प्रसंगी शहरातील भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा व त्यांच्या पत्नी ममता भाभी पिपाडा तसेच शहराचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी वधूचे कन्यादान केले. यावेळी दशरथ तुपे, किरण वाबळे,ॲड. सुनील सोनवणे हे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहाता शहरवासीयांनी स्मशानभूमीतील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळयास उपस्थिती दाखवून विवाह सोहळ्याची शोभा वाढवली.