• Wed. Sep 16th, 2026
बदलापूरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

बदलापूर : बदलापूरच्या कात्रप पनवेल हायवेवर शुक्रवारी संध्याकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तरुणाच्या खांद्यावर गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बदलापूरमधील गोळीबारात गुन्हेगार सुनील प्रजापती उर्फ टक्का याला गोळी लागून लागली असून तो जखमी झाला आहे. सुनील उर्फ टक्का हा उल्हासनगरच्या आझाद नगरमधील रहिवासी असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, टक्का हा शुक्रवारी सायंकाळी बदलापूर पूर्वेच्या कात्रप पनवेल हायवेवर गेला असता तिथे हा गोळीबार झाला आणि एक गोळी त्याच्या शरीरात घुसली आहे.

Devendra Fadanvis : सत्ता बदलली, पण माझा आनंद फार काळ टिकला नाही, कारण…; देवेंद्र फडणवीसांनी दिली जाहीर कबुली

सायंकाळी टक्का याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितल्याने कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, हा गोळीबार कोणी केला, कशासाठी केला, याची अधिक माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणारत अधिक तपास करत आहे. पूर्व वैमनसातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed