• Mon. Nov 25th, 2024

    पूर बघायला दुचाकीवरून गेलेले शिक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता, गाडी सापडल्याने कुटुंबियांची काळजी वाढली

    पूर बघायला दुचाकीवरून गेलेले शिक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता, गाडी सापडल्याने कुटुंबियांची काळजी वाढली

    चंद्रपूर: पूर बघायला गेलेला शिक्षक दोन दिवसापासून बेपत्ता आहे. शिक्षकाची दुचाकी वर्धा नदीच्या पुलावर दिसून आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून एनडीआरएफची टीम शोध घेत आहेत.अजय लटारी विधाते असे बेपत्ता असलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्हातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या कोडशी येथील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत आहेत.

    प्राप्त माहिती नुसार,कोरपना तालुक्यातील कोडशी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले आणि वणी जैन ले-आऊटमध्ये रहिवासी असलेले शिक्षक अजय लटारी विधाते मागील दोन दिवसापासून घरी पोहचलेच नाही. यासंदर्भात कुटुंबीयांनी वणी पोलिसात तक्रार दिली असून कुटुंबीयांसह पोलिसांनी शोध सुरु केला आहे. शिक्षक अजय विधाते हे बुधवार १९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता फेरफटका मारून येते असे सांगून घरून दुचाकीने निघाले. रात्र होऊनही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली.गुरुवारीही सर्वत्र शोधाशोध करण्यात आली.मात्र त्यांचा शोध लागलाच नाही.

    शॉर्ट कट मारणे भलतेच महागात पडले; असे काही घडले की अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवावे लागले
    दरम्यान, पाटाळा परिसरात त्यांची दुचाकी आढळल्याने एनडीआरएफच्या पथकाना पाचारण करण्यात आले. वर्धा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफ शोध घेत आहे.अद्याप शोध लागलेला नाही.चंद्रपूर जिल्हात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्या ओसंडून वाहू लागल्यायात.अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर शेकडो घरात पाणी शिरले. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed