• Sat. Sep 21st, 2024
खड्डा चुकविण्याच्या नादात तोल गेला, डम्परच्या चाकाखाली आला, अपघातात जागेवरच प्राण सोडले

कल्याण : तोल जाऊन डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मलंग रोड द्वारली परिसरात घडली. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यारील खड्डे चुकवत असताना या दुचाकीस्वाराचा तोल गेला. खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

सूरज गवारी असे मयत इस्माचे नाव असून कल्याण पूर्व चिंचपाडा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कल्याण मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जातेय. मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार या रस्त्याने जात होता. या दुचाकीस्वाराचा तोल गेला, तो थेट शेजारून जात असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केलाय. मयत दुचाकीस्वाराचे नाव सुरज गवारी असे असून तो कल्याण पूर्व रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.

वर्षाची चिमुरडी, तरणाबांड रमेश अन् ७० वर्षाची आजीही गेली, मन सुन्न करणाऱ्या इर्शाळवाडीच्या घटनेतील मृतांची नावे समोर
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जातोय. खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली होती. खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील ते बुजवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येतेय.

जळगावात एसटीला ट्रकची धडक, १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवासी जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed