• Sat. Sep 21st, 2024
धक्कादायक, आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला पती आणि सासऱ्याची मारहाण, संतापजनक घटना समोर

अमरावती : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि सासरा या दोघांनी मिळून गर्भवती असलेल्या पत्नीवर हल्ला केला. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीनं आणि सासरा अशा दोघांनी अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्षेत्रात आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली. यामध्ये संबंधित महिलेच्या कानाचा पडदा फाटला. ही धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संकेत पवार आणि करतारसिंग पवार दोघेही रा. चाळीसगाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चाळीसगाव येथील ८ महिन्यांची गर्भवती विवाहिता अमरावती येथे माहेरी आली होती. ९ मार्च रोजी पती संकेत आणि सासरा करतारसिंग अमरावतीत आले होते. दोघांनीही तिच्याशी वाद घातला. पती संकेत याने त्याची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे म्हटल्यावर करतारसिंग पवार तिथे आला. त्याने संकेतला तिला मारण्यासाठी प्रोत्साहित केले. हिला मारून टाक, आपल्याला फक्त चार वर्षे जेल होईल. आपल्या आयुष्याची कटकट मोकळी होईल, असे म्हणून करतारसिंगने तिला शिवीगाळ केली.
मोठी बातमी: अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, आणखी एका भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण
संकेतने तिच्यावर दगड उचलला. त्याचवेळी ती फिरल्याने तो दगड तिला लागला नाही. त्यावर संकेतने मागून तिच्या कानावर जोरात बुक्की मारली. त्यामुळे तिच्या कानातून रक्त निघाले. ती खाली कोसळली. यानंतर तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखल करण्यात आले. या मारहाणीमुळे तिच्या कानाचा पडदा फाटल्याचे निदान करण्यात आले. परंतु, ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याने ऑपरेशन करण्यात आले नव्हते. बाळंतपणामुळे आपण वेळेत तक्रार करू शकलो नाही. पतीने बुक्की मारल्यानेच कानाचा पडदा फाटल्याची तक्रार त्या विवाहितेने १५ जुलै रोजी फ्रेजरपुरा पोलिसांत दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संकेत व करतारसिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफांची ओळख करुन देताना आमदारांचे विधानसभेत ‘जय श्रीराम’चे नारे!

दरम्यान, पोलीस आता गर्भवती महिलेच्या तक्रारीनंतर पुढे कोणती कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.

बेईमानी करणाऱ्यांना आमच्या दारात प्रवेश नसतो, पवारांच्या जागी असतो तर दादांना गेट लॉस्ट केलं असतं : संजय राऊत

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed