• Sat. Sep 21st, 2024
२३ वर्षीय जवानाने कर्तव्य बजावतानाच आयुष्य संपवलं, यमगरवाडीवर शोककळा

सांगली : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील जवानाने ऑन ड्युटी आत्महत्या केली. मयूर लक्ष्मण डोंबाळे असं २३ वर्षीय जवानाचं नाव आहे. जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आपले जीवन संपवले.

या घटनेने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात यमगरवाडीसह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.

CCTV| रुग्णवाहिकेनेच जीव घेतला, रिव्हर्स घेताना अ‍ॅम्ब्युलन्सखाली चिरडलं, पुण्यात वृद्ध ठार
त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

कुंडमळा धबधब्यावरील व्हिडिओ ठरला शेवटचा, पिकनिकला आलेला तरुण वाहून गेला
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो देशसेवेसाठी सैन्य दलात भरती झाला होता. मात्र त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगावमधील जवान राहुल माळी यांना साश्रू नयनांनी निरोप; चार वर्षाच्या चिमुकल्याकडून पित्याला मुखाग्नी

आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी, सरपंच अशोक यमगर, उपसरपंच नारायण यमगर, तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. माळी, ग्रामसेवक दीपक जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभेदार मेजर आनंदराव पाटील, १४ मराठाचे नायब सुभेदार बाबासाहेब वावरे, अर्जुन यमगर, पोलिस पाटील संजय यमगर यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

बाई असल्याचं भासवून लग्न, नाजूक क्षणी फुटलं बिंग, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed