• Mon. Nov 25th, 2024
    उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; उपमुख्यमंत्र्यांसह भाजपवर टीका, म्हणाले- फडणवीस हे नागपूरसाठी कलंक

    नागपूर: उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव यांनी फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटले आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर स्वत:चा विश्वासघात केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व आणि प्रभू राम यांच्यासोबत गद्दारी केली आहे.
    उद्धवजी कलंकीचा काविळ झाला असेल तर उपचार करून घ्या, फडणवीसांचा पलटवार
    फडणवीस यांची खिल्ली उडवत ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची अवस्था अशी झाली आहे की, त्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झाले असे विचारले तर ते काहीच बोलत नाहीत. काहीतरी घडले असेल पण ते सांगू शकत नाहीत. ठाकरे यांनी फडणवीस यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. ज्यात फडणवीस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, सत्तेबाहेर राहावे लागले तरी चालेल पण आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, नाही, नाही, असे म्हणाले होते.

    हा ऑडिओ ऐकवल्यानंतर उद्धव म्हणाले, फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे. भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”काल ज्याला भ्रष्ट म्हणायचे त्याच्या मागे सर्व तपास यंत्रणा लावायची. त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं, ते तुमच्यासोबत आले की त्याला मंत्री करायचे. भाजपने आपले विचार पूर्णपणे संपवले आहेत. पक्ष फोडून पक्ष वाढवण्याची हे जात आहे. ही हिंदुत्वासोबत गद्दारी आहे”.

    भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांची घोषणाबाजी, ठाकरे म्हणाले अरे आगे तो बढने दो !

    उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, ”आमचे हिंदुत्व स्वच्छ आहे. आपला हिंदू धर्म स्पष्ट आहे. अशा गद्दारांना आमचा हिंदुत्वात स्थान नाही. ‘मुँह में राम और बगल में छुरी’ हे आमचे हिंदुत्व नाही. आम्ही राम-राम म्हणत आणि इतरांना मारत राहणे हे आम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी भगवा झेंडा फाडण्याचा प्रयत्न केला. भगव्या झेंड्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी आहे. धनुष्यबाणावर संशय निर्माण करण्याचे काम तुम्ही केले. हा रामाचा विश्वासघात आहे. तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, पण गद्दारांना दिलेले धनुष्यबाण म्हणजे प्रभू रामासोबत गद्दारी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed