• Sat. Sep 21st, 2024

खबरदार! महिला, मुलींवर वाईट नजर टाकाल तर…; दामिनीचा दंडुका बसेल, पुण्यातील ताजी घटना

खबरदार! महिला, मुलींवर वाईट नजर टाकाल तर…; दामिनीचा दंडुका बसेल, पुण्यातील ताजी घटना

पुणे : ‘मॅडम, प्रवासादरम्यान एक तरुण माझ्याकडे एकटक पाहतोय. माझा पाठलाग करतोय, अशी शंका आहे. मला भिती वाटत आहे. आपली मदत पाहिजे…’ लोणावळा ते पुणे लोकलने प्रवास करणाऱ्या एका तरुणीने शहर पोलिसांच्या दामिनी पथकाला मदतीसाठी साद घातली. त्यावर लोणावळा लोकल पुण्यात दाखल होण्याआधीत दामिनी पथक रेल्वे स्थानकात पोहोचले आणि त्यांनी तरुणीला ताब्यात घेऊन घरी सुखरूप पोहोचवले.

सदाशिव पेठेत पेरुगेट पोलिस चौकीजवळ एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात हा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्या पार्श्वभूमीवर दामिनी पथक, बडी कॉप, पोलिस काका आदी योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला होता. त्यानुसार दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांना त्या दृष्टीने प्रशिक्षणही देण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरभरात दामिनी पथकांकडून गस्त घातली जात असल्याचे दिसून येते.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एक तरुणी कामानिमित्त मुंबईला गेली होती. तेथून परतत असताना त्या तरुणीने लोणावळा ते पुणे प्रवास लोकलने केला. या प्रवासात एक तरुण लोणावळ्यापासून तरुणीच्या मागावर असल्याचे आणि एकटक तिच्याकडे पाहत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणीने हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. ती तरुणी लोकलमधून शिवाजीनगर रेल्वे स्थानकात उतरणार होती. त्यामुळे लोकल पोहोचण्याआधीच दामिनी पथक तेथे पोहोचले. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांनी तरुणीशी संवाद साधला होता. स्थानकात कोठे भेटायचे हे त्यांनी निश्चित केले होते. त्यानुसार सर्व घडले. पोलिस कर्मचारी पाहून तो तरुण तेथून पळून गेला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी तरुणीला घरापर्यंत सोडले. दामिनी पथकाच्या मदतीमुळे तरुणी सुखावली होती.

एका पोलिस ठाण्यासाठी दोन पथके

पोलिस दलाच्या रचनेनुसार पाच परिमंडळांत ३० पोलिस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलिस ठाण्यांसाठी दोन दामिनी पथके कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्या हेल्पलाइनचे क्रमांक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात आले आहेत; तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते प्रसारित केले आहेत.

पेरुगेट येथील घटनेनंतर शहरातील दामिनी पथकांची संख्या चौदावरून चाळीसपर्यंत वाढविण्यात आली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षणही दिले आहे. अधिकधिका महिला, तरुणींपर्यंत दामिनी पथकाचे हेल्पलाइन नंबर पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून गरजूंना मदत पोहोचविणे शक्य होईल.- अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा, शहर पोलिस
अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी साधली संधी; पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये चढले अन्…,प्रवाशांनी सांगितली आपबीती
ठळक आकडे

१६
यापूर्वीची दामिनी पथके
२४
नव्याने स्थापन केलेली दामिनी पथके
२४००
जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत दामिनी पथकाला मदतीसाठी प्राप्त झालेले कॉल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed