• Sat. Sep 21st, 2024

उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेतीमाफियांचा प्राणघातक हल्ला; बुलढाणा जिल्ह्यातील घटना

उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेतीमाफियांचा प्राणघातक हल्ला; बुलढाणा जिल्ह्यातील घटना

म.टा. वृत्तसेवा, बुलढाणा : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग करणाऱ्या उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यात घडली. याप्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार रेतीतस्करांविरुद्ध कडक कायदे करीत असतानाही त्यांची दहशत कायम असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

काय घडलं?

देऊळगाव राजाचे उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड हे शुक्रवारी मंडळ अधिकारी रवींद्र घुगे, तलाठी संदीप वायाळ, नीलेश जाधव आणि चालक चव्हाण यांच्यासह अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या टिप्परच्या शोध मोहिमेवर होते. सरंबा फाट्यापासून काही अंतरावर त्यांना दोन विनानंबरचे टिप्पर रेती वाहतूक करताना दिसले. त्यांनी पाठलाग सुरू केला. अधिकाऱ्यांचे वाहन आपल्या मागे येत असल्याचे पाहताच टिप्परचालकाने सरंबा-सुरादरम्यान रस्त्यावरच रेती रिकामी केली. सोबतच पाठीमागून बोलेरोतून (एमएच २८ सी ६७७७) येणाऱ्या त्याच्या साथीदाराने उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वाहनाला धडक दिली. या धडकेमुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. मात्र, वेळीच गाडी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने अधिकारी बचावले.

Buldhana Bus Accident:’विदर्भ ट्रॅव्हल्स’चा चालकाची ती चूक नडली; २५ निष्पाप जीव गेले, मोठं कारण समोर
याप्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र घुगे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांत बोलेरो वाहनातील स्वप्निल तळेकर (वय २५, रा. वाकद), बळीराम मुंडे (वय २५, रा. नारायणखेड) व दोन टिप्परचालक अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed