• Sat. Sep 21st, 2024

उलट्या, तोंडाला फेस अन् सुगंधा कोसळली, नाशिकच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

उलट्या, तोंडाला फेस अन् सुगंधा कोसळली, नाशिकच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, नाशिक: देवगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या सुगंधा काशिनाथ वारे (वय १४, रा. निमणवाडी) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. उलट्या झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. सुगंधाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच खरं कारण समजू शकणार आहे.

मासिक पाळी आहे म्हणून वृक्षारोपण करता येणार नाही, या प्रकरणाने चर्चेत आलेली देवगाव आश्रमशाळा यावर्षी एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने पुन्हा चर्चेत आली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सर्व मुली आश्रमशाळेत झोपलेल्या असताना सुगंधाला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तिच्या खोलीतील मुलींनी तेथे मुक्कामी असलेल्या एका शिक्षकास याबाबत माहिती दिली.

पाणीपुरी खाल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरात खळबळ
सुगंधा उलट्या करीत असताना तिच्या तोंडाला फेस आला आणि ती निपचीत झाली. कर्मचाऱ्यांनी तिला खासगी गाडीतून खोडाळा येथे उपचारासाठी नेले. तेथे खासगी डॉक्टरने तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. सुगंधाचा मृत्यू नक्की कशाने झाला, याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत.

नर्सिंगच्या शिक्षणासाठी जम्मूहून नागपूरला; एक चूक जीवावर बेतली, मैत्रिणीच्या मृत्यूनं धक्का
विशेष म्हणजे प्राथमिक अहवाल पाहाता कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवल्याने गूढ वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी सुगंधावर झडपेची शस्त्रक्रिया झाली असल्याचे आश्रमशाळेतील एका शिक्षकाने सांगितले. दरम्यान, या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगी मागच्या पंधरा दिवसांपासून आश्रमशाळेत निवासी आहे.

नाशिकमधील पेठ महामार्गावर एसटी अन् सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात

पालक म्हणतात, मुलीचे ऑपरेशन होऊन दोन वर्षे झाली आहेत. तिला कोणताही आजार नव्हता. शिक्षक मुक्कामी राहत नाही. उपचारास उशीर झाल्याने जबाबदार असलेल्या अधिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed