• Sat. Sep 21st, 2024

अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना

अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…;  नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना

हिंगोली : अचानक जमिनीतून धूर निघून त्या ठिकाणचे दगड काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती तहसील कार्यालयाला कळाल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी जमिनीतून दूर निघत असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महावितरणचे अधिकारी देखील उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील जमीन अचानक गरम होत असून या ठिकाणावरून धूर निघत आहे. हा धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी जाऊन पाहणी केली. जमिनीमधून धूर निघत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी असलेला विजेचा पुल देखील कोसळून पडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…
घाबरलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती पोलीस पाटलांना दिली त्यानंतर त्यांनी जमिनीमधून धूर निघत असल्याची माहिती तहसील प्रशासन यांना दिली. घटनेची माहिती मिळताच तलाठी एम. एफ. फोपसे, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महावितरण वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता अश्विन कुमार मेश्राम यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केलीय. ज्या ठिकाणी जमिनीतून धूर निघत आहे. त्या ठिकाणचे दगड देखील काळे पडले आहेत. नेमका हा जमिनीतून दूर कशामुळे निघत आहे आणि जमीन गरम का होत आहे हे आता अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमधून समोर येणार आहे. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सोलापुरातील एका अपार्टमेंटमध्ये माकडाचा उच्छाद; घरात शिरून थेट फ्रीजमधील पदार्थांवर ताव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed