नवी दिल्ली 5 : योगविषयक जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.
माध्यम संस्था 8 जुलै 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान , 2023 साठी त्यांच्या प्रवेशिका आणि आशय सामग्री [email protected] या लिंक वर पाठवू शकतील. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मीडिया हाऊसेस 10 जून ते 25 जून 2023 या कालावधीत तयार केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या किंवा दृकश्राव्य/दृश्य सामग्रीचे प्रसारण/प्रसारण केलेल्या लेखाच्या संबंधित क्लिपिंगसह विहित नमुन्यात तपशील सादर करणे आवश्यक आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने द्वितीय वर्षाच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’ पुरस्कारांबाबत घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान 2023 अंतर्गत, मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडिओ अशा तीन वर्गवारीत 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 33 पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये ”वृत्तपत्रांमध्ये योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी” 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. “इलेक्ट्रॉनिक मीडिया (दूरचित्रवाणी) मधून योगाभ्यासाच्या सर्वोत्तम प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. “इलेक्ट्रॉनिक मीडिया (रेडिओ) द्वारे योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.
पुरस्काराचे स्वरुप
या पुरस्काराच्या सन्मानाची शिफारस स्वतंत्र ज्युरीद्वारा करण्यात येईल. सन्मानामध्ये एक विशेष माध्यम/प्लेक/ ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्राचा समावेश असेल.
आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मानाबद्दल
भारत आणि परदेशात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी ओळखून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जून, 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मानची (एआयडीएमएस ) स्थापना केली होती. पहिले पुरस्कार 7 जानेवारी 2020 रोजी प्रदान करण्यात आले आणि त्यानंतर कोविड 19 महामारीमुळे विलंब झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे सन्मान पुनरुज्जीवित करण्याचा आणि 2023 मध्ये दुसरी आवृत्ती आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या https://pib.gov.in/indexd.aspx तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळांवर या विषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
000000000
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.115 / 5.7.2023