• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पुणे जिल्ह्यातील ८४ गावांना पुराचा धोका; तुमचं गाव आहे का? वाचा एका क्लिकवर…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील ८४ गावे पूरप्रवण म्हणून निश्चित करण्यात आली असून, त्या गावांमधील रहिवाशांना दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक १६ गावे आहेत. त्यानंतर मावळ तालुक्यातील दहा, आंबेगाव आणि शिरूरमधील प्रत्येकी नऊ, मुळशी तालुक्यातील सात, भोरमधील तीन गावांचा समावेश आहे. इंदापूर, बारामती, खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक, जुन्नरमधील दोन गावे आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण क्षेत्रांचा आराखडा तयार केला आहे; तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Monsoon 2023 : मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पूरप्रवण ठिकाणे

हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतीनगर आणि इंदिरानगर, संगमवाडी, लोणी काळभोर, चांदे, वाकड, औंध, दापोडी, सांगवी, बाणेर, हिंगणगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चोवीसवाडी, निरगुडे, सांगवी.

जिल्ह्यातील प्रमुख पूरप्रवण गावे

भोरमधील पऱ्हाटी, लुमेवाडी आणि नीरा, खेड तालुक्यामधील सांगुर्डी, आंबेगाव तालुक्यातील चांडोली, पारगाव, निगुडसर, नारेाडी, चिंचोली, जवळे, पडवळ, गणेगाव दुमाला, बाभुळसर आणि तांदळी, जुन्नर तालुक्यातील सारवरगाव आणि नारायणगाव, हवेली तालुक्यामधील पिंपरी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, पेरणे, आष्टापूर, नाव्ही सांडस, वडू खुर्द, शिरूरमधील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, वडगाव रासाई, वढू बुद्रुक, आपटी, रांजणगाव, सांडस आणि म्हाळुंगे, दौंडमधील नांदूर, वडगाव, काशिंबे, गोनवडी, खोरवडी, वडगावढेरे, पेडगाव, सोनवडी, मलठण, बावडा, गणेशवस्ती, भांडगाव हातवळण, हिंगणेबेरडी आणि शिरापूर, इंदापूरमधील नीरा नरसिंहपूर, मावळमधील भावडी, पुलगाव, सांगवी सांडस, लोणावळा, कामशेत आणि वडगाव मावळ; तसेच देहू आणि आळंदी यांचा समावेश आहे.

NCP Crisis : लेकीसाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी फोडली, भाजपच्या मंत्र्याची बोचरी टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed