• Mon. Nov 25th, 2024

    राष्ट्रवादीतील बंडाचा क्लायमेक्स उद्याच? हायहोल्टेज बैठकांमध्ये काय होणार? दोन्ही गटांचं आवाहन

    राष्ट्रवादीतील बंडाचा क्लायमेक्स उद्याच? हायहोल्टेज बैठकांमध्ये काय होणार? दोन्ही गटांचं आवाहन

    मुंबई : अनेक ठिकाणी शरद पवारांना समर्थन देत कार्यकर्ते आणि नेते अजित पवारांना विरोध करत आहेत. तर काही ठिकाणी अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेत्यांचे समर्थन मिळत आहे. पण अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे किती आमदार आहेत? अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ते आता उद्या समजणार आहे. दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या हायहोल्टेज बैठकांमधून दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
    Maharashtra Politics : दिलीप वळसे पाटलांनी एकनाथ शिंदेंना बंडात मदत केली? जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक आरोप
    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडाने उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीतील आणखी ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण अजित पवार यांना राष्ट्रवादीतील किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना किती आमदारांचं समर्थन आहे? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे किती आमदारांचे संख्याबळ हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.
    अजित पवार सरकारमध्ये आले अन् महाराष्ट्राने असं काही केले जे आजवर देशात कधीच झाले नाही
    राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५३ आमदारा आहेत. यापैकी ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा हा आपल्याला असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून केला जात आहे. तर शरद पवारांच्या गटाकडून बहुसंख्य आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला जात आहे. पण किती आमदारांचा कुठल्या नेत्याला पाठिंबा आहे? याचा नेमक आकडा समोर आलेला नाही. आता हा आकडा उद्याच्या बैठकांमध्ये आमदारांच्या उपस्थितीवरून स्पष्ट होणार आहे. या बैठकांसाठी
    बैठकीसाठी दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आले आहेत.

    शिंदेंमुळे नव्हे भाजपमुळे चुकीचा पायंडा, राजकारणात येऊन चूक झाली; रोहित पवारांची उद्विग्न प्रतिक्रिया

    शरद पवार करणार मार्गदर्शन

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, कार्याध्यक्ष आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आज संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे बुधवारी ५ जुलैला दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विटमधून दिली आहे.

    सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. एक प्रकारे या बैठकीतून शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच शरद पवारांना किती आमदारांचे समर्थन आहे? हे या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या संख्येवरून स्पष्ट होणार आहे.
    अजित पवार गटाची उद्या बैठक

    दुसरीकडे अजित पवार गटानेही उद्याच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक वांद्रे येथील एमईटी संस्थेत सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना बोलावण्यात आलं आहे. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष, राज्यस्तरीय पदाधिकारी, समन्वयक तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक-युवती, तसेच विद्यार्थी संघटनांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असं आवाहन सुनिल तटकरे यांनी केलं आहे. यावेळी अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे? हे स्पष्ट होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed