तिरोडा येथून दहा किलोमीटर दूर सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाला होता. तो दुरुस्त करण्याकरिता खेमराज साठवणे विहिरीत उतरले. परंतु बराच वेळ होऊन सुद्धा ते बाहेर आले नाही म्हणून सचिन भोंगाडे खाली उतरले. त्यांना वाचविण्याकरता प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत देखील उतरले असता विजेचा शॉक लागून दोघांचाही मृत्यू झाला. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.
वाचवायला गेलेल्यांनी देखील जीव गमावला
खेमराज साठवणे त्यांच्या विहिरीत खराब झालेला पंप दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरले होते. यावेळी विजेच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला. ते बराचवेळ बाहेर न आल्यानं सचिन भोंगाडे खाली उतरले. त्यांना देखील विजेचा धक्का बसला. यानंतर आणखी दोघे जण विहिरीत उतरले. त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सरांडी गावावर शोककळा पसरली आहे. प्रशासनानं या घटनेचा शोध सुरु केला आहे.
एक बिघाड आणि चौघांनी जीव गमावला
मोटार सुरु होत नसल्यानं खेमराज साठवणे विहिरीत उतरले होते. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांच्या पाठोपाठ विहिरीत उतरलेल्या सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे आणि महेंद्र राऊत यांना देखील जीव गमवावा लागला. विजेच्या धक्क्यानं चार जणांचा मृत्यू झाल्यानं सरांडीतील ग्रामस्थांना धक्का बसला आहे.
सतर्कता बाळगणं आवश्यक
पावसाळ्याचे दिवस असल्यानं सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. शेतात गेल्यानंतर अनेकदा वाऱ्यामुळं विजेच्या तार तुटून पडलेल्या असतात. शेतकऱ्यांच्या त्या लक्षात आल्यानं त्यांना जीव गमवावा लागतो.अनेकदा वाऱ्यामुळं विजेच्या तारा तुटून पडल्यानंतर देखील विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक असतं.