• Sat. Sep 21st, 2024
मुंबईत अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती

अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईतही असे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईत सायनमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

 

mumbai news
मुंबईत अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती
मुंबई : मुंबईतील सायनमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेज आणि आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त पथनाट्य सादर करण्यात आलं आहे. वांद्रे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. सतीश हिवाळे यांनी यावेळी विद्यार्थी आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तर सहायक प्राध्यापक सचिन बोटे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागानं पथनाट्याचं आयोजन केलं होतं. लॉ कॉलेजमधील विद्यार्थी यात उत्साहानं सहभागी झाले होते.’जागतिक अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोध दिन’ या निमित्तानं पथनाट्य सादर करण्यात आलं. लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळात वेळ काढून हे पथनाट्य पाहिलं. पथनाट्यातून दाखवण्यात आलेलं वास्तव डोळे उघडणारं असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केली. अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा यावेळी अनेकांनी घेतली. पथनाट्य सादरीकरण सुरू असताना अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed