• Fri. Mar 6th, 2026

    गोमांस तस्करीच्या संशय, जमावाकडून मारहाण; पंधरा दिवसात दोन घटना, दोघांचा मृत्यू

    गोमांस तस्करीच्या संशय, जमावाकडून मारहाण; पंधरा दिवसात दोन घटना, दोघांचा मृत्यू

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
    या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आफण अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसएमबीटी कॉलेज जवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. स्विफ्ट कारमध्ये गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून हा प्रकार घडला.या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चपात्या खावू घालून बिबट्याचे हाल, वनविभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

    दरम्यान, मृत आणि जखमी दोघेही मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. कसारा घाट परिसरात जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून गाडी अडवण्यात आली होती. यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीत दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता.
    नवऱ्यानं चिकन बनवलं, खाताच बायको बेशुद्ध, पुढे आक्रित घडलं; तपासात धक्कादायक प्रकार उघड
    त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा दिवसाच्या अंतराने तालुक्यात तशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिस याबाबत पुढील काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    गोमांस-मॉब लिंचिंग आणि अत्याचारींचा सत्कार, हे आमचे हिंदुत्व नाही: उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed