• Mon. Nov 25th, 2024

    ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची संघटना प्रतिनिधींशी चर्चा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 23, 2023
    ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची संघटना प्रतिनिधींशी चर्चा – महासंवाद

                बीड, दि. 23,(जि. मा. का.) :- समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार यांच्या अडीअडचणी संदर्भात शासकीय अधिकारी व ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. यावेळी ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना केल्या.

          शासकीय विश्रामगृह बीड येथे 22 जुन 2023 रोजी या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजकुमार शिंदे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीडच्या  उपायुक्त  मकरंद,  सहाय्यक आयुक्त समाज  कल्याणचे एस. एन. चिकुर्ते, जिल्हयातील विविध उसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी जिवन राठोड, दादासाहेब मुंडे, बबन माने, तत्वशिल कांबळे, ओमप्रकाश गिरी, मनिषा तोकले व इतर उपस्थित होते.

             या बैठकीमध्ये उसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शासकीय वसतीगृह सुरु करणे, मयत झालेल्या उसतोड कामगारांच्या वारसानां शासनस्तरावरुन लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून या वसतीगृहासाठी बाह्य स्त्रोत, मनूष्यबळ आणि प्रवेशित मुलामीलंकरिता सोयी सुविधा पुरविण्याची कार्यवाही शासन स्तरावर सरु असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उसतोड कामगारांची नोंदणी जलद गतीने करणे, उसतोड कामगार गर्भवती महिला कामगारांसाठी आरोग्य शिबिर घेणे, जिल्हा पुरवठा विभागाला रेशनकार्ड, पोर्टेबलीकरण करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.

    यासह जिल्हा आरोग्य विभागाने उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी, पुर्नरागमन शिबिर आयोजित करुन त्यांना योजनांबद्दल समुपदेशन करावे. कामगारांच्या पाल्यासाठी  संत भगवान बाबा शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया जलग गतीने सुरु करावी, अशा सूचना संबधितांना केल्या. तसेच उसतोड कामगारांच्या विम्या संदर्भात महामंडळ संचालक बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे सूचित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed