• Sun. Sep 22nd, 2024

आदिवासी लाभार्थ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध वस्तूंचे वाटप – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 23, 2023
आदिवासी लाभार्थ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध वस्तूंचे वाटप – महासंवाद

यवतमाळ, दि २३ जून   (जिमाका):- जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना जिल्हा वार्षिक आदिवासी  उपयोजनांतर्गत पारधी विकास योजनेतून तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून विविध वस्तूंचे व धनादेशाचे वाटप अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नेर येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले.

            घरी विदयुत व्यवस्था नसणा-या अजंती पारधी बेडयावरील पारधी लाभार्थ्यांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. तसेच झोंबाडी पारधी बेडयावरील २ पारधी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे प्रत्येकी ९० हजार रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोलाम याआदिम जमातीतील लाभार्थ्यांना सकस आहार व ताजा भाजीपाला मिळण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण योजनेतून महाबीज परसबाग भाजीपाला बियाणे किटचे वितरण नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा व कामनदेव येथील लाभार्थ्यांना करण्यात आले. सदरची योजना प्रकल्प अधिकारी, एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प, पुसद जि.यवतमाळ यांचे मार्फत राबविण्यात आली असुन आदिवासी लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी प्रकल्प अधिकारी, आत्माराम धाबे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद, तहसिलदार नेर शरद मगर, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी लाभार्थी मोठया संख्येने हजर होते. आभार गृहपाल एस.बी. पाईकराव यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed