अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास गैरप्रकार येऊन अनेक कॉफी शॉप, हॉटेल्सवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र कठोर निर्बंध नसल्याने, असे प्रकार शहरात वाढत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाला मिळत होत्या. त्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांच्यावर निर्बंधाबाबतीत नियमावलीची सूचना जारी करण्याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या प्रस्तावाची दखल घेत लातूरचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी कॉफी कॅफे शॉप, हॉटेल बाबत नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांना पुढील प्रमाणे नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने नियम जारी केले आहेत. या नियमांची कठोर अंमलबजावणी लातूर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून व्यवसायिकांनी करण्यात येत आहे.
नेमके काय आहेत निर्बंध?
१) कॉफी कॅफे (कॉफी शॉप), हॉटेलमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असणे बंधनकारक आहे
२) कॉफी कॅफे (कॉफी शॉप) व हॉटेलमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत
३) कॉफीशॉप, हॉटेलमधील बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी
४) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नये
५) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये सक्षम प्राधिकार्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजीट बुक) ठेवावे.
६) कॉफीशॉप हॉटेलमध्ये डेक, डॉल्बी, व इतर ध्वनीक्षेपण व्यवस्था प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी
७) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे
८) कॉफीशॉप, हॉटेल शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी.