• Sat. Sep 21st, 2024

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत कुठलीही कपात नाही, गृह विभागाचं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत कुठलीही कपात नाही, गृह विभागाचं स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीचे छापे सुरू असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे कुटुंबाला मोठा झटका दिल्याची चर्चा होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. तसंच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील अतिरिक्त वाहनं आणि मातोश्री बाहेरील सुरक्षेतही कपात केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, गृह विभागाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तसंच यावर स्पष्टीकरण देत सुरक्षेत कुठलीही कपात केली नसल्याचं म्हटलं आहे.

BMC News: ठाकरेंच्या आशिर्वादात काम करणाऱ्या गँगचं खरं नाही, ‘या’ मुद्द्यावरून फडणवीसांचा थेट इशारा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असलेली झेड प्लस सुरक्षा काढून त्यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यासोबतच रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षाही कमी करण्यात आली असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली होती. ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी करण्यात आली असताना उद्धव ठाकरे यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना (ठाकरे गट ) सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा कायम ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. पण गृह खात्याने मीडियातील हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शासनातर्फे मिळणार विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर सर्वप्रथम संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली होती. आता ठाकरे गटातील नेते आणि आमदारांची सुरक्षा कमी केली किंवा काढण्यात आली. यात खासदार अनिल देसाई, विनायक राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार माजी मंत्री अनिल परब, भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही सुरक्षा काढण्यात आली.

मोदींनी लस तयार केली, रामदास पाध्येंच्या पात्रांवरुन ठाकरे-फडणवीसांमध्ये जुंपली

गृह विभागाने स्पष्टीकरण देत काय म्हटले?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबीयांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed