• Mon. Nov 25th, 2024

    ऐंशी जणांच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दोन पॅनल्समध्ये लढत

    ऐंशी जणांच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दोन पॅनल्समध्ये लढत

    Nashik News : नाशिक जिल्हा सरकारी बँक निवडणुकीत मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ऐंशी जणांनी माघार घेतली. या नंतर सहकार पॅनल आणि समता पॅनल अशा दोन्हीही बाजूंच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपापली भूमिका स्पष्ट केली.

     

    ऐंशी जणांच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दोन पॅनल्समध्ये लढत
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा सरकारी बँक निवडणुकीत माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ऐंशी जणांनी माघार घेतली. परिणामी बँकेच्या २१ जागांसाठी आता सहकार आणि समता या दोन पॅनल्समध्ये सरळ-सरळ लढत होणार आहे.मंगळावारी या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर सहकार पॅनल आणि समता पॅनल अशा दोन्हीही बाजूंच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपापली भूमिका स्पष्ट केली. दोन्हीही पॅनलने अनुक्रमे २१-२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता २१ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या बँकेसाठी दि. २ जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता अर्ज माघारीनंतर चुरस रंगणार आहे. सत्ताधारी समता आणि विरोधी सहकारी पॅनलच्या नेत्यांनी मंगळवारी अर्ज माघारीनंतर विजयाचा दावा केला. बँकेचे १३ हजार २४० सभासद आहेत. यात जिल्हा परिषदेतील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे दोन्हीही पॅनलमध्ये जिल्हा परिषदेशी संबंधित उमेदवारांची संख्या आहे.

    Credit Card Rule: क्रेडिट कार्ड वापरल्यास आता बँकेला द्यावी लागणार माहिती, महत्त्वाची अपडेट नोट करा!
    सत्ताधारी समता पॅनलने वर्षभरापूर्वी नोकरीस लागलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ केली, तर सहकार पॅनलने पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि बांधकाम विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, न्यायालय अशा विविध विभागांत कार्यरत असलेल्यांनाही उमेदवारीची संधी दिली. या मुद्द्यावरूनही दोन्ही पॅनलने एकमेकांवर टीकास्त्र सोडले. समता पॅनलच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब खताळे, विजयकुमार हळदे, सुधीर पगार, शिरीष भालेराव यांनी, तर सहकार पॅनलच्या वतीने रवींद्र थेटे, महेश आव्हाड, दिलीप थेटे, उत्तम गांगुर्डे, दिलीप सलादे, विलास शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सहकार पॅनलने आपले उमेदवार घोषित केले होते. मंगळवारी समता पॅनलने त्यांचे उमेदवार घोषित केले.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *