• Sat. Sep 21st, 2024

इंदुरीकर महाराजांनी घेतली धास्ती, कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरे आणि मोबाइल कॅमेऱ्यांवर बंदी

इंदुरीकर महाराजांनी घेतली धास्ती, कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरे आणि मोबाइल कॅमेऱ्यांवर बंदी

नांदेड : गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची तसेच सोशल मीडियाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमात चक्क चित्रीकरण करणारे माध्यमांचे कॅमेरे बंद करायला लावले.इंदुरीकर महाराजांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांबरोबरच मोबाइलवर शूटिंग करण्यासही मज्जाव केला. इंदुरीकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेतात. काही दिवसापूर्वी इंदुरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात गौतमी पाटील हीचा समाचार घेत टीका केली होती. गौतमी पाटील ही एका गाण्यासाठी तीन लाख रुपय घेते, असे वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता.
गौतमीला पाहून प्रेक्षक आऊट ऑफ कंट्रोल, हुल्लडबाजीमुळे अवघ्या १० मिनिटांत कार्यक्रम संपला, पोलिसांचा लाठीमार
इंदुरीकर महाराज आता सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येतं आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड येथील एका कार्यक्रमात त्यांनी मोबाइल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे बंद करायला लावले.
माहूरच्या रेणुका माता मंदिरात भक्तांची मांदियाळी, एका महिन्यात तब्बल इतक्या लाखांचं दान
इंदुरीकर महाराजांविरुद्ध खटला चालणार

इंदुरीकर महाराजांविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यान्वये खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढला होता. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांनी कायम ठेवला. तसेच इंदुरीकर महाराजांची खटला रद्द करण्याची विनंती मान्य करणारा नगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला आहे. तसेच पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुभा दिली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed