• Sat. Sep 21st, 2024

रोजचं जेवण महागलं, भाजीपाल्यासह कोथिंबीर, टोमॅटो, हिरव्या मिरचीचे दर गगनाला भिडले, आजचा भाव काय?

रोजचं जेवण महागलं, भाजीपाल्यासह कोथिंबीर, टोमॅटो, हिरव्या मिरचीचे दर गगनाला भिडले, आजचा भाव काय?

नागपूर: वाढलेल्या उन्हाळ्याचा परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. उन्हाळ्यात स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत आहे. परिणामत: भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तसेच कोथिंबिर, टोमॅटो, हिरवी मिरची या रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांचे दरदेखील वधारल्याचे चित्र आहे.सध्या बाजारात सुरू असलेली भाजीपाल्याची आवक ही भिलाई, रायपूर, दुर्ग, पंढरपूर, नाशिक, बेंगळुरू, संगमनेर या भागांतून सर्वाधिक आहे. विविध प्रकारच्या भाज्या या भागांतून येत आहेत. त्यातल्या सध्या टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत गेला आहे. बेंगळुरू येथील मगनपल्ली येथून टोमॅटोची आवक होत असून स्थानिक माल येण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत बुलडाणा, औरंगाबाद येथून भाजीपाल्याची आवक सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती महात्मा फुले सब्जी-फ्रुट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली. वाढलेला उन्हाळा पाहता स्थानिक माल येण्यास विलंब होणार असून पावसाळ्यातदेखील गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन दरम्यान भाजीपाल्याचे दर अधिक राहणार असल्याचे सांगितले जाते.

ठोकमधील प्रतिकिलो दर

वांगी : २० रुपये

मिरची : ६० ते ६५ रुपये

कोथिंबीर : ६० ते ८० रुपये

चवळी शेंग : २५ रुपये

गवार शेंग : ५० रुपये

शिमला मिरची : ६० रुपये

पडवळ : ४० रुपये

कारली : ४० रुपये

भेंडी : ३० रुपये

कोहळे : १५ ते २० रुपये

फुलकोबी : ४० रुपये

पानकोबी : २५ रुपये

काकडी : २० रुपये

मुळा : २० रुपये

गाजर : ३० ते ४० रुपये

टोमॅटो : ४० रुपये

मेथी : ६० ते ८० रुपये

पालक : २० रुपये

फणस : ४० ते ५० रुपये

वाल शेंगा : ६० रुपये

ढेमस : ५० रुपये

फरसबीन : ८० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed