• Sat. Sep 21st, 2024

चोरी करण्यासाठी घरात शिरले, काहीच मिळाले नाही म्हणून फ्रिज उघडला अन्…; नेमकं काय घडलं?

चोरी करण्यासाठी घरात शिरले, काहीच मिळाले नाही म्हणून फ्रिज उघडला अन्…; नेमकं काय घडलं?

Parbhani News: सध्या परभणीत चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. परिसरातून अनेक भागात दररोज चोरीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेत चोरट्यांना काहीच न मिळाल्याने त्यांनी चक्क आमरसावर ताव मारल्याचे पहायला मिळाले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान अशां घटनांमुळे रहिवाशांमध्येही घबराटीचे वातावरण पसरलं आहे. यावर आता पोलिसांनी गस्त वाढवावा, अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

 

Parbhani Theft
परभणी

हायलाइट्स:

  • चोरी करण्यासाठी चोरांचा घरात प्रवेश
  • शोधून पण काहीच नाही सापडले
  • फ्रिजमध्ये ठेवलेल्या आमरसावर मारला ताव
परभणी: चोरीच्या उद्देशाने घरामध्ये शिरलेल्या चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या आमरसावर चोरट्यांनी ताव मारला. यानंतर घरातून काढता पाय घेतला आहे. ही घटना परभणी शहरातील ममता कॉलनी भागामध्ये घडली आहे. तर याच चोरट्यांनी इतर दोन ते तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. आज सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल बंदुकीचा धाक दाखवत बळकावले? शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी शहरातील ममता कॉलनी, भारतीय बाल विद्या मंदिर, व्यंकटेश नगर बालाजी मंदिर परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यांना दोन चोरटे घराच्या भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आता सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

अनेक जिल्ह्यात हैदोस घालणाऱ्या बंटी-बबलीला अखेर अटक; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

विशेष बाब म्हणजे चोरी करण्यासाठी आलेल्या या चोरट्यांनी ममता कॉलनी येथील घराचा दरवाजा लोखंडी गज टाकून उघडला. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीतरी लागल्याने त्यांनी किचनमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांना फ्रिजमध्ये आमरस ठेवला असल्याचे दिसून आले. त्यामुळे चोरट्यांनी आमरसावर ताव मारला आणि याच ठिकाणी ठेवलेले शंभर रुपये घेऊन घरातून काढता पाय घेतला. या सर्व प्रकरणातील चर्चा परिसरात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्र ग्रस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तर चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी तपास केला जात आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed