• Sat. Sep 21st, 2024
एमईएस कॉलेजची वेबसाईट हॅक; संकेतस्थळावर दिसलेला मजकूर पाहून पोलिसही आवाक

बुलढाणा:वेबसाईट हॅक करण्याचे लोण आता निमशहरी भागातही पोहोचले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसिद्ध असलेल्या एमईएस कॉलेजची वेबसाइट हॅक झाल्याचे १६ जून रोजी सकाळी समोर आले. दरम्यान संगणकावर साईट ओपन करताच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे वाक्य दिसते आणि यानंतर पाकिस्तानी राष्ट्रध्वज डिस्प्ले होत असल्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या वेबसाइटचा वापर कमी प्रमाणात होत होता. वेबसाइटमधील लुपहोल शोधून हॅकरने ही वेबसाइट हॅक केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनीच याची माहिती संबंधित कॉलेज व्यवस्थापनास दिली. त्यानंतर केलेल्या पाहाणीमध्ये ही बाब समोर आली. ओआरजी डॉमेन असलेली एमईएस कॉलेजची ही वेबसाइट होती. सुदैवाने वेबसाइटवरील सर्व डाटा सुरक्षीत असून ही वेबसाइट बनविणाऱ्या संगणक तज्ज्ञाने ती पूर्ववत केली असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. १६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एमईएस हायस्कूलची वेबसाइट हॅक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर वेगाने हालचाली करत ही वेबसाइट पूर्ववत करण्यात आली.
पोलीस दलात खळबळ! अप्पर एसपीच्या नावाचं फेक फेसबुक अकाउंट; अन् घडला धक्कादायक प्रकार

शिकाऊ हॅकरचा कारनामा?
वेबसाइट हॅक करणारा हा शिकाऊ हॅकर असावा असा संशय सायबर पोलिसांना आहे. ओआरजी डोमेन असलेल्या या वेबसाइटमधील लुपहोल शोधून हॅकरने त्याला जे साध्य करायचे होते ते साध्य केले. अशा पद्धतीने एखादी वेबसाइट हॅक करण्याची ही खूप जुनी पद्धत असून प्रारंभिक स्तरावर शिकाऊ असणाऱ्या हॅकरकडून वेगवेगळ्या वेबसाइटमधील कमकुवत बाबी शोधत त्याचा आधार घेत असे ‘स्कूल बाईज’ टाईप कारनामे केले जातात, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. या प्रकरणात प्रसंगी पाकिस्तानमधील आयपी ॲड्रेस निघू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

सुरक्षा ऑडीट महत्त्वाचे:
जिल्ह्यातील संस्थांनीही त्यांच्या असणाऱ्या वेबसाइट सुरक्षा ऑडीट करावे तसेच वेबसाईटमधील त्रुटी शोधून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. वास्तविक, ही साधीसोपी पद्धत आहे. परंतू त्यास खर्च जास्त येत असल्याने अनेक संस्था याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे असे प्रकार घडतात. सुरक्षा ऑडीटलाही संस्थांनी तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पार्सलमध्ये ड्रग सापडलंय! शिक्षण बारावी, रोजची कमाई १० कोटी; मुंबई पोलिसांनी ट्रिक सांगितली
वेबसाइट हॅक प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार देत असल्याचे कॉलेजचे प्राचार्य गणेश परिहार यांनी सांगितले. ठाणेदार निर्मला परदेशी यांनीही आम्ही तक्रार दाखल करून घेत असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed