• Mon. Nov 25th, 2024
    चला शाळा उघडली, शाळेचा पहिला दिवस; उपसरपंच अन् मुख्याध्यापकांकडून पुस्तक वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू

    जळगाव : आज शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४च्या पहिल्या दिवशी गुरूवार दि. १५ रोजी जि. प.प्राथमिक शाळा पिंप्री बु ता.एरंडोल जि.जळगाव शाळेत पहिल्या दिवशी शाळापूर्व तयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी सरस्वती पूजन, दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. नंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.

    पाठ्यपुस्तक वितरण करताना एस.आर.पाटील (उपसरपंच पिंप्री बु), कैलास सोनवणे (सरपंच पिंप्री बु), जयश्री बबन पाटील (सरपंच पिंप्री प्र. चा.), भाईदास पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक बबन पाटील (पिंप्री प्र.चा.), मुख्याध्यापक संजय पाटील, सर्व शिक्षक वृंद, सर्व पालक, गुरुदास शिंपी सर, समावेशित शिक्षण साधन व्यक्ती, लीलाधर पाटील सर, पंचायत समिती, एरंडोल आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

    गंभीरने पान मसालावरून गावस्करांना झापलं, फॅनने तो व्हिडिओ व्हायरल करत केली बोलती बंद
    एस.आर.बापू आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी गावातील सर्व ६ ते १४ वयोगटातील मुलांचा आपल्या जि.प.शाळेतच प्रवेश घ्यावा, असं आव्हान केलं. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केलं.

    मला ५० वर्षच जगायचंय, पण जाताना हळहळ लावेन, स्मशानातली गर्दी माझं प्रेम सांगेल, धानोरकरांचे शब्द खरे ठरले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *