• Sat. Sep 21st, 2024

बेलापूरमधील पडीक इमारती बनल्या धोकादायक स्पॉट; आठ दिवसात दुसऱ्या घटनेनं खळबळ

बेलापूरमधील पडीक इमारती बनल्या धोकादायक स्पॉट; आठ दिवसात दुसऱ्या घटनेनं खळबळ

नवी मुंबई: शहरामध्ये आत्महत्या आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेलापूरमध्ये आठ दिवसांपूर्वी पार्टी करताना पडीक इमारतीच्या डक मधून पडून १९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा पोलीस अजून तपास करत आहेत तोवरच बुधवार दि.१४ रोजी सकाळच्या वेळी बेलापूर येथील पडीक इमारतीमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अमित कोळी (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एका लोकप्रतिनिधीकडे वाहन चालकाची नोकरी होता. अमित कोळी हा मागील अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

मुंबई- पुणे महामार्गावर खोपोलीजवळ विचित्र अपघात; ७ ते ८ वाहनांची एकमेकांना धडक, अनेकजण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की,बेलापूर सेक्टर १५ येथील अर्धवट बांधकामामुळे पडीक असलेल्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी अमित कोळी (वय ३२) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सकाळच्या वेळी काही लोकांनी त्यांना इमारतीमध्ये प्रवेश करताना पाहिले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पडीक इमारतीतील बिअर पार्टी जीवावर बेतली; नवी मुंबईत १९ वर्षीय तरुणीचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू
मागील काही दिवसापासून ते मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. मात्र,तणावाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी बेलापूर सेक्टर १५ या भागात पडीक इमारतीत पार्टी करताना १९ वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही तरुणी आपल्या मित्राच्या घरात राहत होती. तरुणीच्या मित्राने पार्टी करायचे ठरवले. यावेळी त्याने आपल्या मित्रांना दारू पिण्यासाठी घरी बोलावले होते. मात्र, घरी आई येईल या भीतीने त्यांनी परिसरातील पडीक इमारतीत पार्टी करण्याचा निर्णय घेतला. दारू पिताना तरुणीचा मित्र लघुशंकेसाठी जात असताना तरुणी त्याच्या मागे गेली आणि तिचा पाय घसरून इमारतीवरून पडल्याची घटना घडली होती.

Girl Death : नवी मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; २ दिवस ज्याच्या घरी राहिली त्याच मित्राने…
बेलापूर सेक्टर १५ येथील अर्धवट बांधकामामुळे पडीक असलेल्या इमारतीमध्ये आठ दिवसांपूर्वी घडलेली घटना आणि पुन्हा बुधवारी आत्महत्येची घटना घडल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना इथेच का घडतात अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed