• Mon. Nov 25th, 2024

    गायीने बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटला, मालकाने सोडून दिलं, लोकांना फुटला पाझर, मात्र…

    गायीने बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटला, मालकाने सोडून दिलं, लोकांना फुटला पाझर, मात्र…

    चंद्रपूर: अख्ख तोंड फुटलेल्या अवस्थेतील गाय शहरातील मार्गांवर फिरताना दिसली. तिची ही अवस्था बघून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. त्यानंतर लगेच काहींनी प्यार फाउंडेशनला याची माहिती दिली. त्यांनी दोन दिवस गायीवर उपचार केला. मात्र आज या गायीचा करून अंत झाला. जंगली जनावरांच्या शिकारीसाठी ठेवला गेलेला बॉम्ब गायीन खाल्ला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
    पंक्चर बनवणा-याच्या मुलीची उंच भरारी, गरीबीवर मात करत नीट परीक्षेत डंका
    मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हात येणाऱ्या घुगुस शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. वन्यजीवांच्या शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब एका गायीने खाल्ला. या बॉम्बच्या स्फोटामुळे गायीचा जबळा छिन्नविछीन्न झाला होता. मालकाने या गायीला मरणासाठी सोडून दिले होते. ही गाय शहरातील मार्गांवर फिरताना दिसली. तिची अवस्था बघून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. जखमी प्राण्यासाठी धावून जाणाऱ्या प्यार फाउंडेशनचे देवेंद रापल्ली यांना काहींनी भ्रमणध्वनीने संपर्क साधून गाईबद्दल माहिती दिली.

    ठाणेकरांची समस्या दूर, दुरुस्ती कामामुळे दोन महिन्यांपासून बंद झालेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला!

    प्यार फाउंडेशनच्या टीमने गायीला उपचारासाठी हलविले. जखम फार मोठी होती. गायीवर दोन दिवस उपचार केले गेले. अखेर आज गायीने अखेरचा श्वास घेतला. जंगली जनावरांच्या शिकारीसाठी अन्नपदार्थात स्फोटक पदार्थ ठेवून त्याचे गोळे तयार केले जातात. हे गोळे शेतात अथवा गवताळ भागात ठेवले जातात. एखादा प्राण्याने अन्न समजून हा गोळा खाल्ला की त्याचा स्फोट होतो. या स्पोटात त्या प्राण्याचा मृत्यू होत असतो. हा प्रकार अतिशय घातक आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *