महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वळवी इथे देब्रामल गाव वसलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या उतारापलीकडे नर्मदा नदीचं सुंदर दृश्य इथून पाहता येतं. इथे नदी जवळ असेल असं वाटतं, पण या गावात भीषण पाणी टंचाई आहे. पाच दशकांहून अधिक काळ या गावात मार्च महिना आला की पावसाळ्यापर्यंत तीव्र पाणीटंचाई असते. देब्रामलमध्ये किमान ५० कुटुंब राहतात. त्या प्रत्येक कुटुंबातील एक किंवा दोन लोक असे आहेत जे दोरीच्या मदतीने विहिरीत खाली उतरतात आणि पाणी भरुन वर आणतात. ही विहीर तब्बल ४० फूट खोल आहे.