सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर जावळी तालुक्यातील आनेवाडी फाट्यावर असणाऱ्या उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतला आणि अवघ्या २० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली. सकाळी ११.२० मिनिटांनी महामार्गावर द बर्निंग बसचा थरार प्रवाशांना पाहण्यास मिळाला. चालक- वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व ४० प्रवाशी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.राधानगरी-कोल्हापूरवरून स्वारगेटकडे निघालेली विठाई बस (क्रमांक एमएच- १३-८४१३) पुणे-बंगलोर महामार्गावरून कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. यावेळी आनेवाडी टोलनाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर आलेली असताना बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचं चालक सागर चौगुले यांना दिसलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं.
Satara : आधी महिलेशी वाद, मग भर रस्त्यात पैलवानावर कोयत्याने वार, चांदणी चौकात थरारक घटना
विठाई बसला लागलेली आग इतकी भयंकर होती की दहा ते पंधरा मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली. यावेळी महामार्गावर दूरूनच आगीचे आणि धुराचे लोट दिसत होते. बसमध्ये चाळीसच्यावर प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुण्याकडे रवाना करण्यात आले.
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेला युवक परत आलाच नाही, शर्यतस्थळी घडली धक्कादायक घटना
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. वाई पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याच्या बंबानी आग नियंत्रणात आणली. आगीच्या या घटनेमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. पण काही वेळानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुण्याकडे रवाना करण्यात आलं. संपूर्ण बस जळून खाक झाल्यानंतर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी भुईंज पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवली होती. आनेवाडी टोल नाका येथे अग्निशमक बंब कायम स्वरूपी असावा, अशी मागणी अनेक वेळा नागरिकांनी केली होती.एकुलत्या एका लेकाला देशसेवेसाठी धाडलं, सातारच्या अजिंक्यने लेफ्टनंट पद कमावलं, जिल्ह्याचं नाव उंचावलं