• Mon. Nov 25th, 2024

    बलात्कार करुन बिहारला पळाला, मोबाईल स्वीच ऑफ; सलूनमध्ये ५० रुपये दिले अन् मुंबई पोलिसांनी..

    बलात्कार करुन बिहारला पळाला, मोबाईल स्वीच ऑफ; सलूनमध्ये ५० रुपये दिले अन् मुंबई पोलिसांनी..

    मुंबई: काही दिवसांपूर्वी एका महिलेवर बलात्कार करुन बिहारला पळून गेलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या तरुणाने मुंबईतून निघताना आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला होता. त्यामुळे हा तरुण नेमका कुठे आहे, याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. मात्र, या तरुणाची एक चूक मुंबई पोलिसांनी बरोबर हेरली आणि बिहारमध्ये जाऊन या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. हा तरुण बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात आपल्या बहिणीच्या घरी लपून बसला होता. त्याचा माग काढणे जवळपास अशक्य होते. मात्र, कोणत्याही गुन्हेगाराला पाताळातूनही शोधून काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांनी या तरुणाला सापळा रचून पकडण्यात यश मिळवले.

    Mira Road Murder : धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी दक्षिण मुंबईतील एक तरुणी पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली होती. सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका तरुणाने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. यामुळे संबंधित तरुणी गरोदर राहिली. मात्र, तरुणाने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले, असे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. गुन्हा नोंदवल्यानंतर तरुणीने सांगितलेल्या पत्त्यावर पोलीस तरुणाला शोधण्यासाठी गेले. मात्र, तोपर्यंत या तरुणाने पळ काढला होता. या तरुणाचा मोबाईल फोन स्वीच असल्याने तो नेमका कुठे आहे, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाचे कॉल रेकॉर्डस चेक करुन त्याच्या नातेवाईकांचा शोध लावला. त्यावेळी हा तरुण बिहारचा असल्याची माहिती समोर आली. तसेच या तरुणाची बहीण दरभंगा जिल्ह्यात राहत असल्याचे समजले. बहिणीच्या शेजारच्याच गावात तरुणाची आई वास्तव्याला होती. हा भाग सीमेला लागून असल्याने तरुण नेपाळला पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तरीही ११ मे रोजी मुंबई पोलिसांचे एक पथक दरभंगा इकडे पोहोचले.

    छातीवर अन् चेहऱ्यावर सपासप वार, यात्रेतील जुन्या वादातून दाबेली विक्रेता असलेल्या गरीब मुलाला संपवलं

    मुंबई पोलीस दरभंगा येथे पोहोचल्यानंतर ते सर्वप्रथम तरुणाची बहीण राहत असलेल्या घराजवळ पोहोचले. मात्र, हा तरुण तिकडेच आहे की नाही, याची खात्री नसल्याने पोलिसांनी घरात प्रवेश केला नाही. आम्ही अगोदरच घरात गेलो असतो तर तरुणाला चाहुल लागून तो पळून जाण्याची भीती होती. त्यामुळे आम्ही तिथेच थांबून वाट पाहण्याचे ठरवले. १२ मे रोजी मुंबई पोलिसांचे पथक दरभंगा येथील बहिणीच्या घरावर पाळत ठेवून होते. त्यावेळी मुंबईतील एक कॉन्स्टेबल या तरुणाचे खाते असलेल्या बँकेत गेला. तिथून पोलिसांनी तरुणाच्या बँक खात्याचा तपशील मिळवला. १२ मे रोजी दुपारी पोलिसांनी बँक खात्याचा तपशील मिळाला. त्यामध्ये शेवटचा ऑनलाईन व्यवहार एका सलूनमध्ये झाल्याचे दाखवत होते. या बँक खात्यामधून ५० रुपयांचे ऑनलाईन युपीआय पेमेंट करण्यात आले होते. ज्या सलूनला पैसे पाठवण्यात आले होते, ते दरभंगा येथील होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित सलून मालकाशी संपर्क साधला तेव्हा हे दुकान आरोपी तरुणाच्या बहिणीच्या घरापासून अवघ्या ५० मीटरच्या अंतरावर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सलूनमध्ये जाऊन न्हाव्याला आरोपी तरुणाचा फोटो दाखवून खात्री करुन घेतली. सगळी खात्री झाल्यानंतर पोलीस त्याच रात्री आरोपी तरुणाच्या बहिणीच्या घरात गेले आणि तरुणाला ताब्यात घेतले. त्याला मुंबईला आणून पोलिसी खाक्या दाखवताच तरुणाने आपल्या गुन्हेगारी कृत्याची कबुली दिली.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed