रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे यांची प्रसूती झाली होती. बाळाला कावीळ झाला असल्यामुळे त्याला एन.आय.सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं. बाळाला पाहण्यासाठी त्या जेव्हा या एन.आय.सी यूमध्ये आल्या त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आलं होतं. हा प्रकार पाहताच त्यांना धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी तिथल्या नर्सला विचारलं असता बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लगेच रुग्णालय प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे.
रुग्णालयातील सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रिया कांबळे यांनी तात्काळ तिथून डिस्चार्ज घेत बाळाला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केलं. तसेच घटलेला सर्व प्रकार देखील नातेवाईकांनाही सांगितला.
दरम्यान, याच सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये एनआयसी युनिटमध्ये ठेवण्यात आलेली नवजात मुले दगावल्याची घटना समोर आली होती. परंतु तरी देखील रुग्णालय प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतरआ या एन.आय.सी. यूमध्ये कार्यरत असलेल्या तर सविचा भाईर या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एका नर्सला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर बाळाची दुपटी, डायपरही वेळेवर बदलले जात नाहीत. बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक मिळत नाही. तसंच, नवजात बाळांना दूधही नीट पाजले जात नाहीत, अशा अनेक तक्रारी या रुग्णालयाबाबत केल्या आहेत.