• Tue. Nov 26th, 2024

    मुंबईतील पर्यटनाला सामंजस्य करारामुळे चालना – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    Jun 7, 2023
    मुंबईतील पर्यटनाला सामंजस्य करारामुळे चालना – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 7 : “मुंबई शहरात पर्यटनवृद्धीला मोठी संधी आहे. जगभरातील पर्यटक मुंबईला आवर्जून भेट देतात. टेक एन्टरप्रिनर्स असोसिएशन ऑफ मुंबईबरोबरचा (टीम) सामंजस्य करार मुंबई शहरातील पर्यटन वाढीला चालना देणारा ठरेल”, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

    मंत्री श्री. लोढा यांच्या मंत्रालयातील दालनात हा करार झाला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. एन.पाटील यासह टेक एन्टरप्रिनर्स असोसिएशनचे विशाल गोंदल, फेरजाद वरियवार उपस्थित होते.

    मंत्री श्री. लोढा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा कायापालट सुरू आहे. सुशोभिकरणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे, रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. मुंबई शहरातील सर्व मेगा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई शहर कसे दिसेल, हे अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय आभासी, वेब आणि मोबाईल यांसारख्या विविध माध्यमातून नागरिकांना बदलत्या मुंबईचे डिजिटल साक्षीदार होता येईल”.

    ०००००

    गोपाळ साळुंखे/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *