दरम्यान दोन दिवसांपासून हा मृतदेह या ठिकाणी पडलेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी मुक्ताईनगर येथे घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. ठसे तज्ञांसह फॉरेन्सिसक पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे. मयताची ओळख पटवण्यासाठी मुक्ताईनगर शहरासह विविध पोलीस ठाण्यांना मयताचे छायाचित्र तसेच घटनास्थळावरची परिस्थितीची माहिती देण्यात आली. दरम्यान चिनावल येथील रवींद्र मधुकर पाटील हे बेपत्ता असल्याने त्याबाबत तक्रार देण्यासाठी रवींद्र पाटील यांची पत्नी नम्रता पाटील आज सकाळी सावदा पोलीस ठाण्यात पोहोचली. पती बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंदणी करण्यात आली.
इतक्यात सावदा पोलिसांना मुक्ताईनगर येथील पोलिसांकडून मृतदेह आढळून आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नम्रता पाटील या आणि रवींद्र पाटील यांचे भाऊ योगेश पाटील हे मुक्ताईनगर पोहोचले. रवींद्र पाटील यांच्या हातावर त्यांचे मुलगी रोशनी तिचं नाव गोंदलेलं होतं. त्यानुसार मयत हे रवींद्र पाटील हेच असल्याची ओळख पत्नी नम्रता पाटील यांनी पटवली. त्यांनी त्याच ठिकाणी हंबरडा फोडला. रवींद्र पाटील हे पतपेढीच्या अकाउंटचे काम करायचे. ४ तारखेला रात्री १२ वाजेच्या रविंद्र पाटील यांचे त्यांच्या पत्नीशी बोलणं झालं होतं. यादरम्यान त्यांनी पत्नीला मला उशीर होणार असून मी लॉजवर थांबणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर रवींद्र पाटील यांचा फोन बंद झाला होता. ज्या ठिकाणी रवींद्र पाटील यांचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यांची दुचाकी मिळवून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.
याप्रकरणी मयत रवींद्र पाटील यांचे भाऊ योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रवींद्र पाटील यांच्या ओळखीतीलच व्यक्तीने त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जळगाव सध्या गुन्हेगारीचे घरच बनत आहे. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. जळगावातील या वाढत्या गुन्हेगारीकडे पोलीस प्रशासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे बनले आहे. यावर वेळेत कठोर कारवाई न केल्यास येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.