• Sat. Sep 21st, 2024

मायलेकाचा अपघाती मृत्यू, मृतदेहाजवळ दोन मुली बसलेल्या, मन सुन्न करणारं दृष्य

मायलेकाचा अपघाती मृत्यू, मृतदेहाजवळ दोन मुली बसलेल्या, मन सुन्न करणारं दृष्य

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात आई आणि चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुचाकीचालक वडील आणि दोन मुली असे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

सातिवली-धावलीपाडा येथील रहिवासी असलेले बारकू डवला आपली पत्नी आणि चिमुकला मुलगा त्याचप्रमाणे आणखी दोन मुली असे संपुर्ण कुटुंब धुंदलवाडी येथे जात होते. हे कुटुंब कुटुंब धुंदलवाडी येथील रुग्णालयात जात होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धुंदलवाडी येथे जात असताना विवळवेढे उड्डाणपूलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण असा अपघात घडला आहे.

Solapur News: आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल
या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर स्वार असलेले पाचही जण दुचाकीवरून खाली पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात आई केरू बारकू डवला (वय ४०) आणि चिमुकला जैविक बारकू डवला (वय ३) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवस्वार तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. बारकू डवला (वय ४५), सुवर्णा डवला (वय १३) आणि प्राची डवला (वय १०) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

समुद्राच्या पोटात दडलंय बक्कळ सोनं; संपूर्ण देश अनेक वर्ष बसून खाईल, पण बाहेर काढायचं कसं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed