मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर सेशन कोर्टाने महिनाभरानंतर आरोपीला जामीन मंजूर केला आहे. आरोपी असलेल्या एका २६ वर्षीय तरुणाची डेटिंग अॅपवरून २८ वर्षीय महिलेशी २०२१ मध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम होऊन शारीरिक संबंध निर्माण झाले. एक वर्षांहून अधिकाळापासून त्यांच्यात शरीरिक संबंध राहिले. यानंतर महिलेने तरुणावर बलात्काराचा आरोप केला. लग्नाचं आमिष दाखवून आपल्याला फसवलं आणि अत्याचार केला, असा आरोप तिने केला. या प्रकरणी जामिनासाठी अर्जदाराने प्रभावी कारण दिल्याने कोर्टाने जामीन दिला आहे.या प्रकरणी तरुणाने कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. लग्नाच्या बोलणीसाठी तरुणीचे आई-वडील आपल्या पालकांना भेटले होते. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी चर्चेत मोठी गोष्ट सांगितली. तरुणीचे आधीही एका व्यक्तीसोबत संबंध होते, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे आपल्याला विचार बदलवावा लागला, असा युक्तिवाद तरुणाच्या बाजूने कोर्टात करण्यात आला. या प्रकरणात तरुण हा गेल्या महिन्यापासून कोठडीत आहे. आणि या दरम्यान चौकशी पूर्ण व्हायला हवी होती. यामुळे त्याला सुनवणीदरम्यान अधिककाळ कोठडीत ठेवणं योग्य नाही, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं.
अपघात विम्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, १२ वर्षांचा लढा यशस्वी
जामिनाच्या या आदेशात केलेली निरीक्षणं केवळ जामीन अर्जापुरती मर्यादित आहेत आणि या निरीक्षणाचा पुढील सुनावणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. तरुणापेक्षा महिला ही वयाने मोठी आहे. संबंधित काळात आरोपी शिकत होता आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हता, असंही कोर्टाने म्हटलं.वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांची सेवानिवृत्ती, नागरिकांकडून जल्लोषात निरोप
या प्रकरणात महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती आणि तिने अनेक प्रसंगी आरोपीला मोठी रक्कम पाठवल्याचे दर्शविण्यासाठी तिने स्क्रीनशॉट्सचा संदर्भ दिला आहे. त्याचवेळी स्क्रीनशॉट आणि बँकेच्या पासबुकची एक प्रत पाहिली असता आरोपीने काही रक्कम माहिती देणाऱ्याला हस्तांतरित केल्याचं दिसून येतं. किंबहुना आयपीसी कलम ३७६ अन्वये बलात्काराचा आरोप आणि खोट्या आश्वासनाचा संबंध आहे तोपर्यंत ती रक्कम दुसऱ्या पक्षाला देणं महत्त्वाचं ठरत नाही. तर अर्जदार आणि महिलेतील लैंगिक संबंध हे सहमतीने झाले, हे महत्त्वाचं असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.