पुणे : सध्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिकावर मारायचे कीटकनाशक पिऊन त्याने आपले जीवन संपवले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. संतोष संपत शेलार (४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी किरण सीताराम शेलार यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष शेलार यांनी सोयापनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्या व्यवसायामुळे ते कर्जबाजारी झाले होते. तसेच त्यांच्या शेतमालाला देखील बाजारभाव मिळत नव्हता. त्यामुळे वाढता कर्जाचा डोंगर त्यांना फेडणे आवघड जात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

शेलार हे माजी मंत्री विजय शिवतारेंचे भाचे
संतोष शेलार हे माजी मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांचे भाचे म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष संपत शेलार हे पांगारे शेलारवस्ती येथे २ जून रोजी दुपारी १ च्या सुमारास बालदरा डोंगराकडे गेले होते. ते परत आले नाही. त्यानंतर ते गेलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.