कोण आहे नम्रता?
तीन वर्षांची असताना नम्रताची आई आणि पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर नम्रताला अंधेरीतील बेघर, अनाथ मुलांसाठी असलेल्या स्नेहसदन या एनजीओमध्ये ठेवण्यात आलं. आई-वडील गमावल्यानंतर तिने पुस्तकांमध्ये आपलं मन रमवलं. तसंच मोकळ्या वेळेत ती बॅटमिंटन खेळत होती. इथे ती स्वत:चे कपडे धुवायची तसंच अधून-मधून जेवण बनवायलाही मदत करायची.
अभ्यास करायला मजा येत होती. माझ्या मैत्रिणींनी मला अवघड वाटणाऱ्या विषयात मदत केली आणि मी ज्या विषयात चांगले होते त्या विषयात मी त्यांना मदत केली. आम्ही सर्वांनी मिळून अभ्यास केला असल्याचं नम्रता सांगते. ती आठवीपर्यंत सेंट जोसेफ एएम हायस्कूलमध्ये होती. पुढे इयत्ता नववी आणि दहावीचं शिक्षण तिने होली फॅमिली स्कूलमध्ये पूर्ण केलं. इंग्रजी विषय तिचा आवडीचा असल्याचंही ती म्हणाली. आता पुढे तिला सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. त्याशिवाय ती NEET चा विचार करत असल्याचंही म्हणाली.
नम्रताच्या या यशाने तिच्या आश्रमातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या यशाचं कौतुक होत असून तिला पुढील शिक्षणासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर नम्रता आश्रमातच राहिली आणि तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण तिने पूर्ण केलं.
दरम्यान, राज्यात १५ लाख ७७ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८४ हजार ४१६ मुलं तर ७३ हजार ६२ मुली होत्या. यंदाच्या SSC परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे.