गेल्या एक महिन्यापासून हे वयस्क माकड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच बडा बाजार येथील सुरेश हॉटेलमध्ये न चुकता मंगळवारी आणि शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोहोचतं आणि आपल्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसतो. त्या टेबलवर अन्य कुणी बसला असला तरीही त्याला काहीच फरक पडत नाही. हा त्याचा नित्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून असून हॉटेल मालक देखील तो आल्यावर त्याला नाश्ता व पाणी देतात.
या माकडाला कधी भजींची तर कधी समोसे आणि कचोरीची मेजवानी मिळते. आता तर हॉटेलमध्ये येणारे ग्राहक सुद्धा या माकडाचे मित्र झाले असून त्याला आपल्या जवळचा नाश्ता ऑफर करायला चुकत नाही. हॉटेलचे मालक बाबन पंचभाईंचे म्हणणे आहे की, त्यांच्या हॉटेलमध्ये हे माकड गेल्या एक महिन्यापासून येत आहे. पहिल्या दिवशी तो हॉटेलात आला तेव्हा ग्राहक घाबरले होते. परंतु तो येऊन शांत बसला असल्याने त्याला थोडा नाश्ता देऊन बघितले. त्यानी तो नाश्ता केला आणि पानी पिल्यावर मुकाट्याने निघून गेला. त्यानंतर दर मंगळवार आणि शनिवार ते माकड आता इथे येत. सध्या या माकडाची संपूर्ण पंटक्रोशीत चर्चा आहे.
दरम्यान, हा वयस्क माकड थेट हॉटेलात येऊन टेबलवर बसून आपल्या आवडत्या पदार्थावर ताव मारतो. हा त्याचा नित्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून असून हॉटेल मालक देखील तो आल्यावर त्याला नाश्ता आणि पाणी देतात. शिवाय हे माकड कुणालाही इजा न पोहचवता नाश्ता आणि पाणी पिल्यानंतर निघून जातं. विशेष म्हणजे, हे माकड मंगळवारी आणि शनिवारी फक्त ह्या दोन दिवशीच हॉटेलमध्ये येतं इतर दिवशी ते कुठे जातं? काय खातं? याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. त्यामुळे ठराविक दिवशी येणाऱ्या या माकडाला बघण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येत असतात.