• Sat. Sep 21st, 2024

बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अंथरुणाला खिळला; हाक देताच शिंदे मदतीला धावल्याने डोळ्यात अश्रू

बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अंथरुणाला खिळला; हाक देताच शिंदे मदतीला धावल्याने डोळ्यात अश्रू

सोलापूर : सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे माजी सचिव अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून पडले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्याने मदत उद्धव ठाकरेंकडे मागायची की एकनाथ शिंदेकडे हा मोठा प्रश्न पडला होता. माध्यमांशी संपर्क साधत अरुण कामतकर यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी आर्त हाक दिली होती. या हाकेला एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिसाद देत आजारी असलेल्या अरुण कामतकर यांची भेट घेतली आणि त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद घडवून आणला. अरुण कामतकर यांच्या औषधोपचाराचा खर्च करू, असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसंच रोख १ लाख रुपयांची मदत केली आहे. बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला मदत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.अरुण कामतकर हे मणक्याच्या आजारामुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. ते एसटी कामगार सेनेचे माजी पदाधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आर्थिक मदत न देता केवळ औषधोपचाराचा खर्च द्यावा, अशी मागणी कामतकर यांनी केली होती. मी बरा झाल्यानंतर काम करून आपले सर्व पैसे परत देईन. त्यामुळे आता मला माझ्या पायावर उभे करा. मी आपल्याकडे भीक मागत नसून मदत मागत आहे, असं अरुण कामतकर यांनी म्हटलं होतं.

शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

बाळासाहेबांच्या कट्टर सैनिकाला पडला होता पेच

बाळासाहेबांचा शिवसैनिक असलेल्या अरुण कामतकर यांच्यासमोर आजारपणानंतर मोठा पेच पडला होता. कारण एक वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि अरुण कामतकर या हाडाच्या शिवसैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांकडेही मदतीची विनवणी केली होती. एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांची शिवसेनेकडे औषधोपच्या मदतीसाठी आर्त हाक दिली होती. याला एकनाथ शिंदे गटाचे व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रतिसाद देत अरुण कामतकर यांची भेट घेतली. हाडाच्या शिवसैनिकाला आर्थिक मदत करत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed