• Mon. Nov 25th, 2024

    सावरकर जयंतीसाठी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवींचा पुतळा हटवला, छगन भुजबळांची सरकारवर टीका

    सावरकर जयंतीसाठी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवींचा पुतळा हटवला, छगन भुजबळांची सरकारवर टीका

    नाशिक : रविवारी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदन येथील सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते उपस्थित होते. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे केलेले दुष्कृत्य हे अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

    Pune Loksabha Bypoll: पुणे लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
    विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावरकरांची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते.या प्रकरणाचा छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

    राष्ट्रवादी ओबीसी विरोधी पक्ष असता तर मला विरोधी पक्ष नेते केलं नसतं – धनंजय मुंडे

    हीन मानसिकतेचं नवल वाटतंय- छगन भुजबळ

    भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
    लेकरांनी करून दाखवलं, शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; पोलिसात दोघं तर तिसरा सैन्यात भरती, सांगळे कुटुंब चर्चेत
    भाजपचा पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न- यशोमती ठाकूर

    सावरकर यांची जयंती काल महाराष्ट्र सदनात साजरी करत असताना सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवल्याने काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपचा निषेध केला. भाजपला पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे. ते पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे दिल्लीतील महिला खेळाडूंचे आंदोलन मोडून टाकत आहेत. याचा मी निषेध करते अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed