• Mon. Nov 25th, 2024
    सकाळी सकाळी दारू पिऊन शिवभोजन थाळी खायला गेला, मालकाने नकार देताच केलं भयंकर कृत्य

    नागपूर : नागपूर शहरातील गोळीबार चौक येथील शिव भोजनालयात जेवण न दिल्याच्या कारणावरून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार जेवण देण्यास नकार दिल्याने एका मद्यधुंद तरुणाने हॉटेल मालकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रदीप निखारे (वय ३०,रा.मोचीपुरा, पाचपावली) याला अटक केली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार चौकात घडली.नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा
    मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील गोळीबार चौकामध्ये फिर्यादीचे शिव भोजनालय आहे.या भोजनालयाचे मालक विजय सुभाष पौनीकर (वय 50, रा. तांडापेठ, जुनी वस्ती पाचपावली) हे मागील दोन वर्षांपासून सकाळी शिवभोजन थाळीचे भोजनालय चालवतात आणि इतर वेळेत फोटो काढण्याचे काम करतात.

    आरोपी प्रदीप नामदेव निखारे हा फिर्यादींच्या उपाहारगृहात जेवायला येत असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. शुक्रवारी सकाळी प्रदीप दारू पिऊन त्यांच्या भोजनालयात आला. त्यावेळी प्रदीप याने माझ्याकडे पैसे नाहीत मला ऊधार जेवण द्या अशी मागणी केली. पौनीकर यांनी आधी पैसे द्या, पैसे दिल्यानंतर जेवण देतो असे सांगितले असता, आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे तेथील लोकांनी आरोपीचा पाठलाग केला.

    आधी आभार, मग नागपुरी भाषेत औकात शब्दांचा अर्थ सांगत फडणवीसांची राहुल गांधींवर सडकून टीका

    मात्र, यामुळे दुखावलेल्या प्रदीपने बाहेर जाऊन थर्माकोल कटिंग कटर आणून पौनिकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. शिवभोजन केंद्रावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

    Nagpur News : पोलिसाने लाच नाकारल्याने ठकबाजाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; काय घडलं असं?
    या घटनेनंतर काही वेळातच तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी प्रदीपला पकडून बेदम मारहाण केली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. तहसील पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी विजय यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पौनीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तहसील पोलिसांनी आरोपी प्रदीपविरुद्ध कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed