सांगली: जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या ठिकाणी वारणा नदीमध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल सुतार (वय १६) आणि रविराज सुतार (वय १२),अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा मावस भावांची नावे आहेत. रविराज हा आपल्या मावशीकडे सुट्टी निमित्त आला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तो आणि त्याचा मावस भाऊ अमोल सुतार हे वैरण काढण्यासाठी वारणा नदी काठी असलेल्या शेतात गेले होते.
यावेळी वैरण काढल्यानंतर दोघे पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यामध्ये बुडाले.अमोल सुतार आणि रविराज सुतार या दोघांनाही पोहता येत नव्हतं. तरीही, नदी काठी वैरण काढून झाल्यावर दोघांना रखरखत्या उन्हात नदीचे पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

अमोल सुतार हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिली होती. आई वडिलांना तो एकुलता एक होता. तर रविराज सुतार हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. दोघांच्याही घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. मुलांच्या मृत्यूने सुतार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी आणि लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढले. तरूण मुलांच्या अशा अनपेक्षित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.