• Mon. Nov 25th, 2024

    चोराने खड्ड्यात लपवून ठेवले ७७ लाख रूपये, पोलिसांनी चोरट्याच्या वडिलांना अटक केली अन् मग…

    चोराने खड्ड्यात लपवून ठेवले ७७ लाख रूपये, पोलिसांनी चोरट्याच्या वडिलांना अटक केली अन् मग…

    नागपूर : नागपूर पोलिसांनी एका चोरट्याच्या वडिलांना अटक केली. कारण ते ही मुलाच्या पापात वाटेकरी होते. हा चोरटा चोरी करायचा आणि चोरीचा माल, दागिने, पैसे घेऊन छत्तीसगडमध्ये लपून बसायचा. २ दिवसांपूर्वी मानकापूर, नागपूर येथील रहिवासी मनीष कापई यांच्या घरातून ७७.५३ लाखांची चोरी करून हा चोर छत्तीसगडला पळून गेला होता. चोरट्याने हे सर्व पैसे एका खड्ड्यात लपवून ठेवले. ही रक्कम छत्तीसगडमधील खैरागढ जिल्हातील उदयपूरगावात लपवण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांना आरोपी नरेश अकालू महिलांगेचा सुगावा लागला. पोलिसांनी उदयपूर गावातील त्याच्या घरावर छापा टाकला पण तो आधीच त्याच्या प्रेयसीसह पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांना एका खड्ड्यातून ७७.५३ लाख रुपये मिळाले. ते पैसे पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी नरेशचे वडील अकालू यांना अटक केली. नरेश आणि त्याच्या मैत्रिणीचा पोलीस शोध घेत आहेत.

    वडिलांना मारल्याचा राग, मुलाने कट रचला आणि आवारेंचा काटा काढला, आरोपीने सगळं सांगितलं

    आरोपीच्या वडिलांनी पोलिसांची दिशाभूल केली पण…

    नरेश हा चोरीचा माल नागपुरातून छत्तीसगड येथील त्याच्या घरी नेत होता. नरेशच्या वडिलांना याची माहिती होती. चोरीची कल्पना असतानाही वडिलांनी पोलिसांची दिशाभूल केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला नागपुरात आणले. मुलगा चोरी करायचा आणि बाप माल लपवायचा. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, बोटांच्या ठशांच्या आधारे नरेशचा शोध घेतला. पोलीस छत्तीसगडमधील उदयपूर येथे त्याच्या घरी पोहोचले तेव्हा खोलीत केलेल्या खड्ड्यात लाखो रुपयांची रोकड लपवून ठेवली होती. नरेशवर वाहन चोरीसह इतर २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    मित्राची मस्करी करणं महागात पडलं, खिशातला मोबाईल काढला म्हणून मित्राला जिवानिशी मारलं
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष कपाई यांची साईबाबा नगरमध्ये वैद्यकीय उपकरणे विक्रीची कंपनी आहे. कपाई कुटुंब काही दिवसांसाठी अमृतसरला गेले होते. त्यावेळी नरेश याने बंगल्यात घुसून ७० लाख रुपयांची रोकड व दागिने चोरी केले त्याने कारही चोरली आणि नंतर दारूच्या नशेत तो आपल्या मैत्रिणीच्या घरी गेला. प्रेयसी पिंकीला घेऊन तो रेल्वे ट्रॅकजवळ गाडी सोडून छत्तीसगडला गेला. येथे चोरीचे पैसे घरात बनवलेल्या खड्ड्यात लपवून ठेवले होते.

    नवरा बाहेरगावी, मुलगा नातेवाईंकाकडे, व्हॉट्सअप स्टेटसला पतीचा फोटो लावून नर्सकडून आयुष्याचा शेवट!
    गावकऱ्यांसाठी रॉबिनहूड

    मानकापूर पोलिसांनी महिलांगेच्या राजनांदगावात अनेकांची चौकशी केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. बहुतेक लोक गरीब आणि मजूर होते. नरेश त्यांना वेळोवेळी पैसे देत असे. उपचार, लग्न, घर खरेदी, जीवनावश्यक वस्तू यासाठी पैसे देत होते. त्यापैकी कोणीही पैसे परत केले नाहीत. आरोपींनी एका अपंग भिकाऱ्याला ५० हजार रुपये दिले होते. गावकऱ्यांसाठी एक उपयुक्त व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा होती. त्याच्याकडे गर्लफ्रेंडची मोठी यादी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed