• Sat. Sep 21st, 2024
मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मध्यरात्रीपासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेकडून विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. एन प्रभागामधील रेल्वे उड्डाणपूल लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग आणि रामकृष्ण चेंबूरकर (आरसी) मार्ग यांना जोडणार आहे. पुलासाठी विद्याविहार स्थानकावर पहिला गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी कुर्ला आणि भांडूपदरम्यान मध्य रेल्वेने आज, शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.

कुर्ला ते भांडूप

मार्ग – अप डाऊन धीमा, जलद आणि पाचवी-सहावी मार्गिका

वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १.१० ते रविवारी पहाटे ४.२०

प्रवाशांचा होणारा गोंधळ थांबणार; दादरच्या फलाटांचे क्रमांक बदलणार; असे असतील नवे नंबर्स…
रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्या

शनिवारी रात्री ११.४७ सीएसएमटी ते ठाणे

रविवारी पहाटे ४.०० ठाणे ते सीएसएमटी

रविवारी पहाटे ४.१६ ठाणे ते सीएसएमटी

रविवारी मध्यरात्री २.३३ कर्जत ते सीएसएमटी (ठाणे स्थानकापर्यंतच असेल)

रविवारी पहाटे ५.१६ सीएसएमटी ते अंबरनाथ (ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल)

ठाणे स्थानकात रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस

– ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क

– १८०३० शालीमार-एलटीटी

१२८१० हावडा-सीएसएमटी दादर स्थानकात रद्द करण्यात येणार आहे.

सीएसएमटी-एलटीटीकडे विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या

– १२८१० हावडा मेल

– १२१३४ मंगळूरू

– १८५१९ विशाखापट्टणम

– २०१०४ गोरखपूर

– १२७०२ हैदराबाद

– १११४० गदग एक्स्प्रेस

(या मेल-एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.)

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यंदा पेरणीची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed